बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रजनीकांतने (Rajinikanth) आता आर. माधवनची भेट घेतली आहे. नुकताच अभिनेता आर माधवनचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी सत्कार करण्यात आला. यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणनही उपस्थित होते. हा आनंद माधवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)