दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची (Rajnikant) क्रेझ अद्यापही चाहत्यांमध्ये कायम आहे. त्यांच्या 'जेलर' (Jailer) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. 10 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने जगभरात 600 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याने चांगलच मानधन घेतलं आहे. 'जेलर' या सिनेमासाठी अभिनेत्याला 110 कोटी रुपये आधीच दिले होते. पण आता सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या मानधनात आणखी वाढ झाली आहे. रजनीकांतला 'जेलर' या सिनेमासाठी एकूण 210 कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)