Fighter Trailer Out: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या एरियल अॅक्शन चित्रपट 'फायटर' (Fighter) द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटातील गाणी आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. आता प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि करण सिंग ग्रोव्हर हवाई दलातील अधिकारी म्हणून देशभक्तीच्या भावनेत बुडलेले दिसत आहेत. (हेही वाचा - Rohit Shetty ने Singham Again च्या सेटवरील धमाकेदार व्हिडिओ केला शेअर; म्हणाला, 'तुम्ही लोक पतंग उडवता आणि मी...')
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)