Most Expensive Indian Film: सध्या रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ची (Ramayana) चर्चा होत आहे. नुकतेच चित्रपटाच्या सेटवरून काही छायाचित्रे समोर आली होती. आता या चित्रपटाच्या बजेटबाबत एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे. नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण पार्ट वन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे, ज्याचे बजेट 100 दशलक्ष डॉलर्स असेल. भारतीय रुपयांमध्ये या चित्रपटासाठी 835 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. बॉलीवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, निर्माता नमित मल्होत्रा यांना 'रामायण'च्या माध्यमातून भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर नेण्याची इच्छा आहे. या चित्रपटासाठी त्याने 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. नमित मल्होत्रा हा या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या प्राइम फोकस कंपनीचा मालक आहे. नमितला 'रामायण’ व्हिज्युअल ट्रीट बनवायचा आहे, जो पाहून जगभरातील प्रेक्षक थक्क होतील. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नक्कीच वेळ लागेल. 'रामायण पार्ट 1'साठी साधारण 600 दिवस लागतील असे म्हटले जात आहे. (हेही वाचा: Srikanth Box Office Collection: राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी, ओपनिंग वीकेंडमध्ये 11 कोटींहून अधिकचा व्यवसाय)
पहा पोस्ट-
BREAKING: #RanbirKapoor’s '#Ramayana: Part 1' becomes the costliest Indian film; redefines Bollywood with a staggering $100 Million [Rs. 835 crores] budget!!
The film also stars #SaiPallavi, #Yash, #SunnyDeol and #RakulPreetSingh in prominent roles. Directed by #NiteshTiwari. pic.twitter.com/9fdPotWM9L
— Filmy Explorer (@filmyexplorer) May 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)