Zwigato Tax free: कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ या राज्यात टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने दिली माहिती

‘झ्विगाटो’ हा चित्रपट पुर्णपणे ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी चित्रीत केला आहे. दिग्दर्शिका नंदिता दास यांनी आपला चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

Zwigato Tax free: कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ या राज्यात टॅक्स फ्री;  दिग्दर्शिकेने दिली माहिती

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) ‘झ्विगाटो’ या (Zwigato) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला.  कपिल शर्मा आणि नंदिता दासचा (Nadita Das) हा चित्रपट ओडिशा सरकारने टॅक्स फ्री (Tax Free) केला आहे. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नविन पटनायक (Naveen Patnaik) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘झ्विगाटो’ हा चित्रपट पुर्णपणे ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी चित्रीत केला आहे. दिग्दर्शिका नंदिता दास यांनी आपला चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

पहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).