शाहरूख खान आणि नयनताराच्या ‘जवान’ची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या काही बदलांमुळे बराच चर्चेत आला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले असून निर्मात्यांना एकूण चित्रपटामध्ये 7 महत्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली होती. या सिनेमाबद्दल आता एक वाद सुरु झाला आहे.  करणी सेनेनं शाहरूखच्या ‘जवान’मधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे. एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था... या डायलॉगवर करणी सेनेने आक्षेप घेतलाय. चित्रपटातला हा संवाद महाराणा प्रताप यांच्याशी संबंधित असून त्या डायलॉगमुळे करणी सेनेतील व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले.

पाहा जवान चित्रपटाचा ट्रेलर 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)