भारतातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक असलेल्या स्टॅम पेपर घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरीचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. 1 सप्टेंबरपासून ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक हंसल मेहता आणि स्टुडिओ नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अॅपलॉज एंटरटेनमेंटने या मालिकेची निर्मिती केली आहे. तसेच, दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या सिरीजमध्ये अनेक मराठी चेहरे ही दिसत आहेत. ज्यामध्ये सुपरस्टार भरत जाधव, शंशाक केतकर, निखील रत्नपारखी, भरत दाभोळकर असे अनेक कलाकार आहेत.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)