अभिनेता श्रेयस तळपदेला त्याच्या 2012 मध्ये रिलीज झालेल्या कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘कमाल धमाल मालामाल’मधील एका दृश्यासाठी ट्रोल केले जात आहे. या चित्रपटामधील एका सीनमध्ये श्रेयस 'ओम' चिन्हावर पाय ठेवताना दिसत आहे. तब्बल 10 वर्षानंतर चित्रपटातील या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अभिनेत्यावर संस्कृती आणि धर्माचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. आता श्रेयसने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणावर माफी मागितली आहे.

त्याने लिहिले की, 'शूटिंग करत असताना अनेक घटक घडत असतात. सिक्वेन्स दरम्यान विशेषत: अॅक्शन सीनवेळी मानसिकता, दिग्दर्शकाच्या गरजा आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये जे पाहतात त्याचे मी समर्थन करत नाही. घडल्या प्रकाराबाबत मी माफी मागतो. मी कधीही जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावणार नाही किंवा असे काहीही करणार नाही.’

दरम्यान, 'कमाल धमाल मालामाल' दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा कॉमेडी चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये श्रेयस तळपदेने जॉनी नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्याशिवाय नाना पाटेकर, ओम पुरी, असरानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)