आपल्या विचित्र विधानांमुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असलेले चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आता आपल्या एका ट्विटमुळे वादात सापडले आहेत. लखनौमधील हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण राम गोपाल वर्मा यांच्या ट्विटशी संबंधित आहे, जे त्यांनी अलीकडेच द्रौपदी मुर्मू, पांडव आणि कौरवांबद्दल केले होते. या ट्विटनंतर दिग्दर्शकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. ट्रोलिंगनंतर राम गोपाल वर्मा यांनीही स्पष्टीकरण दिले असले तरी आता याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Tweet
Uttar Pradesh | An FIR has been registered against film director & producer Ram Gopal Varma at Hazratganj Kotwali Police Station, in connection with his recent controversial tweet on 'Draupadi, Pandavas, & Kauravas'.
(file pic) pic.twitter.com/uKPbajL9mS
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)