अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'पृथ्वीराज' (Prithviraj) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या पहिल्या झलकसाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. या चित्रपटात अक्षय कुमार महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आलेला त्याचा लूक सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे. मानुषीने पृथ्वीराज चौहानच्या मैत्रिणी संयोगिताची भूमिका साकारली आहे. हा मानुषीचा पहिला चित्रपट आहे आणि 2022 च्या बहुप्रतिक्षित पदार्पणापैकी एक आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)