अभिनेता मनोज बाजपेयी यांनी अभिनेता कमाल रशीद खान यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्यास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केआरकेने ट्विटरवर बाजपेयींना 'चरसी गंजेडी' म्हटले होते. त्यानंतर मनोज बाजपेयीने केआरकेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्यासाठी केआरकेने न्यायालयात धाव घेतली होती. आता इंदूर जिल्हा न्यायालयाने म्हटले आहे की, अभिनेत्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब करण्यासाठी अशा शब्दांचा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे केआरकेविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.  उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह यांनी 13 डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, केआरकेने फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 482 अंतर्गत दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)