देशातील वाढत्या कोविड प्रकरणांमुळे पुन्हा एकदा निर्बंध सुरू झाले आहेत. ज्याचा परिणाम चित्रपटांच्या प्रदर्शनावरही होत आहे, कारण गर्दी होऊ नये म्हणून चित्रपटगृहे बंद करण्यात येत आहेत. यामुळे 'RRR', 'जर्सी' सारख्या बहुप्रतिक्षित चित्रपटांचे प्रदर्शन आधीच पुढे ढकलण्यात आले आहे. यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर 'राधे श्याम' ची रिलीज डेटही कोविडमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या कोविड परिस्थितीमुळे चित्रपट निर्मात्यांनी राधेश्यामचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
Tweet
We have to postpone the release of our film #RadheShyam due to the ongoing covid situation. Our sincere thanks to all the fans for your unconditional love and support. pic.twitter.com/cC18q8jmOz
— Radhe Shyam (@RadheShyamFilm) January 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)