अभिनेता रणबीर कपूर आणि श्रध्दा कपूरचा तू झुटी मै मक्कार सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर विविध इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसत आहे. तरी अशाचं एका कार्यक्रमातला अन्ग्री रणबीर कपूरचा व्हिडीओ सध्या सोसल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात रणबीरचा एक फॅन रणबीर बरोबर सेल्फी काढायला येतो आणि वेळेवर त्याच्या फोनमध्ये सेल्फीचं कली होत नाही किंवा काहीतरी तांत्रइक बिघाड होतो. दरम्यान रणबीर त्या चाहत्याचा फोन धरुन थेट फेकून देतो असं या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे. पण रणबीर बरोबर फोटो काढणार हा चाहता पुन्हा पुन्हा फोटो काढत असल्याने रणबीरने संतापून फोन फेकल्याची माहिती कार्यक्रमातील उपस्थितांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)