द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) आणि एसएस राजामौली यांच्या आरआरआरने (RRR) प्रत्येकी ऑस्कर जिंकल्यामुळे जगभरातील भारतीय आनंदात होते. द एलिफंट व्हिस्परर्स हा एका जोडप्याची या हृदयस्पर्शी कथा आहे .ज्यांना एक अनाथ हत्ती रघू हा सांभाळायला देण्यात येतो. आता तो थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये (Theppakadu Elephant Camp) या हत्तीची एक झलक पाहण्यासाठी लोक छावणीत गर्दी करत आहेत. डॉक्युमेंट्रीने ऑस्कर जिंकल्यानंतर लगेचच हे घडले आहे. कॅम्पला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने सांगितले की, "हा खूप मोठा क्षण आहे. इथे आल्याचा आपल्याला आनंद आहे. हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे आणि या चित्रपटाने ऑस्कर जिंकला आहे हे मला खूप आनंदित आणि उत्साहित करते," असे त्यांने सांगितले.
पहा ट्विट -
Mudumalai, Tamil Nadu | After 'The Elephant Whisperers' won #Oscars award for Best Documentary Short Film, people from different parts of the country visit Theppakadu Elephant Camp to witness the Oscar-winning elephant Raghu (13.03) pic.twitter.com/75vycru7Qg
— ANI (@ANI) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)