अभिनेता आणि बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी निधन झाले. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध घेतले होते पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. या बातमीने बॉलिवूड तसेच टीव्ही इंडस्ट्री वर शोककळा पसरली आहे. अनेक सेलेब्जनी सोशल मिडियावर सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आणि बिग बॉस होस्ट सलमान खानने देखील सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने ट्विट केले आहे- 'खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ... तुझी आठवण येईल. कुटुंबाप्रती संवेदना.'

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल सलमान खानने व्यक्त केला शोक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)