Deepika Padukone is Pregnant: अभिनंदन! बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. अभिनेत्रीने गर्भधारणेची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये डिलेवारी होणार आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा होती. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये जेव्हा दीपिका साडीत दिसली तेव्हा चाहत्यांनी तिचा बेबी बंप पाहिला होता. अभिनेत्रीने सब्यसाचीची सिल्व्हर कलरची सुंदर साडी नेसली होती. यामध्ये ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली. बाफ्टा अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर दीपिका मुंबई विमानतळावर दिसली तेव्हा तिचा बेबी बंपही दिसत होता. दरम्यान, आता दीपिकाने ही चर्चा खरी असल्याचे जाहीर केले आहे. लवकरच दीपिका आणि रणवीर सिंगच्या घरात लहान बाळ येणार आहे.
पाहा पोस्ट:
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)