सोमवारी MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे अमेरिकेमध्ये अकाली हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव भारतामध्ये आणण्यात आले आहे. अमोल काळे यांचे पार्थिव आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी मुंबई मधील क्रिकेटर्स सह अनेक राजकीय मंडळींनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. वानखेडे मध्ये आज देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, प्रताप सरदेसाई या राजकीय नेत्यांसोबत धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यांनीही हजेरी लावली. आता, अमोल काळे यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमीत दाखल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)