Mercedes Benz ने भारतात आज 2023 GLC SUV लाँच केली आहे. ही लक्झरी SUV GLC 300 4Matic (Petrol) आणि GLC 220d 4Matic (Diesel) या दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. एक्स-शोरूम मध्ये दिलेल्या माहितीनुसार या लग्झरीची किंमत अनुक्रमे 73.5 लाख रुपये आणि किंमत 74.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून नवीन मर्सिडीज GLC ने 1500+ बुकिंग मिळवले आहेत. तसेच, नवीन लक्झरी SUV गुडगावच्या कॉर्पोरेट हब येथे ऑटोमेकरच्या अगदी नवीन लक्झरी बुटीक डीलरशिप ‘MAR20X शोरूम’ येथे लॉन्च करण्यात आली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)