Maruti Suzuki Recalls 2,555 Alto K10: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या अडीच हजारांहून अधिक अल्टो के 10 (Alto K10) कार परत मागवणार आहे. स्टीयरिंग गियर बॉक्स असेंबलीमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मारुतीने एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की, काही प्रकरणांमध्ये या त्रुटीमुळे कारच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. कंपनी अशा 2,555 गाड्या परत मागवणार आहे. संशयास्पद दोष असलेल्या कारच्या मालकांशी मारुतीच्या अधिकृत डीलर्सद्वारे संपर्क साधून त्यांची तपासणी केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली. काही दोष आढळल्यास, भाग विनामूल्य बदलले जातील. प्रभावित वाहनांच्या ग्राहकांना त्यांच्या गाड्यांचा भाग बदलेपर्यंत वाहन चालवू नका किंवा वापरू नका असा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान, याआधी मार्चमध्येच, कंपनीने बलेनोच्या 11,851 युनिट्स आणि वॅगन आरच्या 4,190 युनिट्स परत मागवल्या होत्या. ही वाहने 30 जुलै 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान तयार करण्यात आली होती. त्यावेळी, जेव्हा इंधन पंप मोटरमध्ये समस्या आढळली होती. (हेही वाचा: Bajaj Chetak 3201 Special Edition: बाजारात लॉन्च झाले बजाज चेतक 3201 स्पेशल एडिशन मॉडेल; जाणून घ्या किंमत, फीचर्स व कुठे खरेदी करू शकाल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)