स्टार किड्सप्रमाणेच आजकाल क्रिकेटर्सची मुलंदेखील सतत मीडियामध्ये असतात. सोशल मीडीयामुळे आता फॅन्स आणि सेलिब्रिटींमधील अंतर कमी झालं आहे. झीवा ही भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंगधोनीची मुलगी आहे. तिच्या क्युट अदा, धम्मालमस्तीचे व्हिडिओ सतत चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियात सतत झीवाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
नुकताच हेअर कट करण्यासाठी झीवा सलोनमध्ये गेली होती. झीवाच्या पार्लर ट्रीपचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. महेंद्रसिंगची पत्नी साक्षीने झीवाचा सलोनमध्ये व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये आपण हेअरकट करण्यासाठी आलोय हे तिच्या खास अंदाजात झीवाने सांगितलं आहे. सलोनमध्ये केस कापण्यापूर्वी झीवा फारच उत्साही होती. तिच्या चेहर्यावर तो आनंद प्रकर्षाने दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी झिवाने चाहत्यांना फीटनेस गोल दिलं आहे. पुश अप्स करतानाचा झिवाचा खास व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आला होता.