Swiggy: स्विगीवर ऑनलाईन लाईम सोडा मागवलेल्या ग्राहकाला कंपनीकडून मिळाला सील केलेला रिकामा ग्लास; X पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
Photo Credit - X

Swiggy: स्विगीकडून एकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ऑर्डर मागवली एक आणि आलं भलतंच असा प्रकार घडला आहे. एक्स वापरकर्ता आर्यंश ने त्याच्यासोबत घडलेला प्रकरा एक्सवर शेअर केला. @aaraynsh ने X वर दावा केला की त्याने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डर केलेल्या लाईम सोडाऐवजी रिकामा सीलबंद ग्लास त्याला मिळाला. ग्लासचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, "धन्यवाद, स्विगी, मला सीलबंद रिकामा ग्लास पाठवल्याबद्दल. मला आशा आहे की माझा लाईम सोडा दुसऱ्या ग्राहकाला मिळाला असेल." पोस्टला लाल हार्टचे इमोजी त्याने कॅप्शन दिले. (हेही वाचा:Viral Video: पार्टीत फटाक्यांमुळे जखमी झालेल्या पत्नीला पतीने सावरले, पण रडणाऱ्या बाळाकडे केले दुर्लक्ष; इंटरनेट संताप व्यक्त )

पोस्ट पाहा-

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया-

पोस्टला आतापर्यंत 180K पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.विशेष म्हणजे स्विगीने या घटनेची दखल घेतली आणि उत्तर दिले. मात्र, संपूर्ण रिफंड दिला गेला नाही. आर्यंशने नंतर स्पष्टीकरण देत कंपनीने 120 किमतीच्या सोड्यावर 80 रुपयांचा परतावा दिल्याचे साांगितले. त्यावर X वापरकर्त्यांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या. 'उष्णतेमुळे त्याचे बाष्पीभवन झाले असावे', 'हवेच्या स्वरूपात सोडा पाठविण्याचे हे नवीन तंत्रज्ञान आहे', 'पुढच्या ऑर्डरमध्ये ते तुम्हाला एक बादली लाईम सोडा पाठवतील', 'तुमच्या घरी पाणी, लिंबू, सोडा, मीठ आणि साखर आहे असे त्यांनी गृहीत धरले ग्लासची खरी समस्या होती. म्हणून त्यांनी तुम्हाला ग्लास पाठवला' अशा प्रतिक्रीया वापरकर्त्यांनी दिल्या.