मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. त्यामुळे ठरलेली लोकल पकडण्यासाठी अनेकदा धावपळ करताना रेल्वेचा रूळ ओलांडला जातो. यामध्ये हकनाक बळी जाणार्या मुंबईकरांची संख्या देखील मोठी आहे. मात्र काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणं हे जीवावर बेतू शकतं हा संदेश देण्यासाठी आज (7 नोव्हेंबर) चक्क पश्चिम रेल्वेने 'यमदूत' रेल्वेच्याच्या रूळांवर उतरवला होता.
'यमदूता'च्या रूपाने रेल्वे पटरी ओलांडणार्यांना तो उचलून नेत होता. याच्यामाध्यमातून ही सवय किती धोकादायक असू शकते हे पटवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता रेल्वे पोलिस फोर्सचा कर्मचारी 'यमराज' च्या रूपात रेल्वे रूळांवर उतरला होता. त्याने नियम मोडणार्यांना अनोख्या अंदाजात कारवाई केली
पश्चिम रेल्वेचं ट्वीट
अनाधिकृत रूप से पटरी पार ना करें, यह जानलेवा हो सकता है ।
अगर आप अनाधिकृत तरीक़े से पटरी को पार करते हैं तो सामने यमराज खड़े हैं ।
मुंबई में पश्चिम रेलवे द्वारा आरपीएफ के साथ मिलकर 'यमराज' के कैरेक्टर के माध्यम से लोगों को जागरूक किया जा रहा है। pic.twitter.com/UM5O5OYQIR
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 7, 2019
दरम्यान या आधी देखील पश्चिम रेल्वेकडून अशाप्रकारे रेल्वे प्रवाशांमध्ये रूळ ओलांडू नये म्हणून जनजागृती करण्यासाठी जाहिराती बनवल्या होत्या. मुंबई रेल्वे पोलिसांच्या नियमांनुसार रेल्वेचे रूळ ओलांडणे हा गुन्हा आहे. तुम्ही रूळ ओलांडताना दिसल्यास कारवाई सोबताच तुरूंगवासाची शिक्षादेखील होऊ शकते.