मुदस्सर गुर्जर, 'जगातील सर्वात उंच क्रिकेटर' (Photo Credit: Twitter)

Tallest Cricketer in The World: गोलंदाजी विभागात असो किंवा फलंदाजी असो, पाकिस्तानने जागतिक क्रिकेटला काही उत्कृष्ट क्रिकेटपटू दिले आहेत. इमरान खान, वसीम अक्रम, वकार युनूस, इंझमाम-उल-हक, सईद अन्वर यांच्यासारखे अनेक खेळाडूंनी पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. आता, पाकिस्तानचा 7 फूट 6 इंच उंचीचा क्रिकेटपटू सध्या सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे आणि राष्ट्रीय संघात प्रवेश करण्याच्या विचारात आहे. तो म्हणजे गोलंदाज मुदस्सर गुज्जर, ज्याची उंची 7.6 फुटी आहे. त्याचे वय फक्त 18 वर्षे असून पाकिस्तान सुपर लीगसाठी (पीएसएल) लाहोरच्या फ्रँचायझीने त्याला टीममध्ये सामिल केले आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेटमध्ये 7 फूट उंचीच्या खेळाडूचे लक्ष वेधून घेण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, 2010 मध्ये 7 फूट 1 इंच असलेल्या मोहम्मद इरफाननेही वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण दरम्यान लक्ष वेधले होते.

मुदस्सर सध्या पाकिस्तान टीमकडून खेळण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यास तो तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात उंच क्रिकेटपटू ठरेल. लाहोर कलंदर्स आणि क्रीडा पत्रकार साज सादिक यांनी ट्विटरवर मुदस्सरची उंची 7 फूट 6 इंच आणि तो 23.5 साईजचे बूट घालत असल्याचे सांगितले आहे. काही नामांकित प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुदस्सरने गेल्या वर्षी 06 नोव्हेंबरला लाहोर कलंदरच्या विकास कार्यक्रमात भाग घेतला होता. उंचीमुळे, मुदस्सरला काही फिटनेस समस्यांचा सामना करावा लागत आहे परंतु त्याच्या कारकिर्दीत त्याचा काही परिमाण होणार नाही याची खात्री करण्यासाठी तो त्यांच्यावर कार्य करीत आहे.

याशिवाय, लीगच्या आर्थिक मॉडेलबद्दल फ्रँचायझी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत लढाई सुरु आहे. टिकाऊ आर्थिक मॉडेल नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करीत सहा फ्रेंचायझींच्या मालकांनी मंडळाविरोधात संयुक्त याचिका देखल केली होती. वित्तीय मॉडेलने नेहमीच पीसीबीला अनुकूलता दर्शविली आहे ज्यामुळे संघाने कोट्यवधी रुपये कमावले आहेत तर संघ तोट्यात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. बोर्ड पीएसएलचे उर्वरित सामने वर्षाखेरीस आयोजित करण्याच्या विचारात होती, पण सध्य स्थिती पाहता बोर्डासाठी ते कठीण दिसत आहे.