मलेशिया (Malaysia) येथे राहणाऱ्या एका तरुणाला पुरुषार्थ सिद्ध करुन दाखवण्यासाठी चक्क ओळखपत्र (ID) दाखवावे लागते. तर सोशल मिडियावर या तरुणाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. जगातील सुंदर पुरुष (World’s Prettiest Man) म्हणून या तरुणाला ओळखले जात आहे.
अब्दुसलाम फिरदौस अब्दुल अजीज असे या तरुणाचे नाव आहे. तर अजीज याला पाहिल्यावर नक्की तो मुलगा आह हे की मुलगी यामध्ये फरक करण्यास गोंधळतात. कारण अजीजची चेहरेपट्टी ही एका तरुण मुलीसारखी आहे. त्यामुळे त्याला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी सोबत ओळखपत्र घेऊन फिरावे लागते. तर अजीजने केस कापले तर त्याला लोक टॉम बॉय म्हणून चिडवण्यास लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या अजीजने दाढी वाढवली तर तो कॅटफिश सारखा दिसू लागल्याने ती दाढीसुद्धा कापली.
तर अजीज एकदा फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी गेला त्यावेळी सुद्धा तेथे तपासणी करणाऱ्या गार्डस् यांना तो मुलगी असल्याचे वाटले. परंतु अजीजने तो मुलगा असल्याचा दावा केल्याने गार्डने त्याचासोबत भांडण केली. शेवटी पोलिसांना ही घटना कळल्यावर अजीजने त्यांना आपले ओळखपत्र दाखवून तो पुरुष असल्याचे सिद्ध करावे लागले.