Kaju Katli Bhajiyas | Photo Credits: X)

Viral Video: इंटरनेटविश्वात क्रांती झाल्यापासून आणि सोशल मीडिया, युट्यूब नावाचा मंच हाती लागल्यापासून प्रतिभावान मंडळींच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. नानाविध संकल्पना घेऊन ही मंडळी कॅमेऱ्यासमोर येतात व्हिडिओ बनवतात आणि लोकचर्चेचा विषय ठरतात. अशा लोकांचे व्हिडिओही चांगलेच व्हायरल होतात. त्यात हा व्हिडिओ जर पाककृतीशी संबंधीत असला तर काहीसे अधिकच. आताही अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जी चक्क बनवते आहे काजूकतली भजी (Kaju Katli Bhajiya) . आतापर्यंत अनेकंनी आईसक्रीम मॅगी, चॉकलेट सँडवीच आणि तत्सम पदार्थ चाखले आहेत. पण, काजूकतली भजी खाण्याची वेळ कोणावर आली नव्हती. अर्थात या महिलेचे कुटुंबीय याला अपवाद ठरले असावेत. या काहीशा हटके पाकृतीचा व्हिडओ आपणही पाहू शकता.

सोशल मीडिया मंचावरील मोहम्मद फ्युचरवाला नावाच्या वापरकर्त्याने @MFuturewala या 'X' हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ही महिला काजूकतली भजी बनविताना पाहायला मिळते. महिलेने मसाले मिसळून बेसन पीठ भिजवले आहे. त्यामध्ये ती काजूकतली घालत आहे आणि ते उकळत्या तेलात तळत आहे. बटाटा भजी किंवा मिर्ची भजी बनवताना जी पद्धत वापरली जाते अगदी तशीच पद्धत काजूकतली भजी वापरतानाही राबवली जात आहे. प्रश्न पद्धतीचा नाही तर अशा चित्र विचीत्र पाककृती बनवून त्याचा स्वाद घेण्याचा आहे. खरेतर अपारंपरीक प्रकारात मोडावा असाच हा प्रकार. (हेही वाचा, Video- Dal With 24-Carat Gold: 24 कॅरेट सोन्याची तडका डाळ, रेसिपी दुबईत प्रसिद्ध, पाहा व्हिडीओ)

एक्स वापरकर्त्याने हा व्हिडिओ 6 मार्च रोजी शेअर केला आहे. तेव्हापासून आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी रिपोस्ट केला आहे तर काहींनी लाईक केला आहे. अनेक वापरकर्त्यांनी तर त्याखाली मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दरम्यान, असे असले तरी अनेक वापरकर्त्यांना ही पाककृती विशेष आवडली नाही. त्यामुळे अनेकांनी आपली नापसंती व्यक्त केली आहे. काहींनी हा केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने केलेला प्रयोग आहे असे म्हटले आहे. काहींनी तर हा असला विचीत्र प्रकार करण्याची गरजच काय? असा थेट प्रश्न विचारला आहे. काहींनी तर 'काजूकतली मेली' असे म्हणत थेट आपल्या भावनाच व्यक्त केल्या आहेत.

व्हिडिओ

सोशल मीडियावर अनेकदा लोक अशा वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ कोणत्याही प्रकारातील असतात. एकदा का हे व्हिडिओ व्हायरल झाले की, लोक त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत असतात. व्हिडिओत दिसणाऱ्या मंडळींनाही प्रसिद्धी मिळते.