Mango Maggi Viral Video: महिलेने बनवली 'मँगो मॅगी'; व्हिडिओ पाहून संतापले नेटीझन्स, Watch
Woman made Mango Maggie (PC - Instagram)

Mango Maggi Viral Video: मॅगी हे एकटे राहणाऱ्या लोकांचे आवडते खाद्य आहे. ही अशी डिश आहे, ज्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. मॅगी (Maggi)  जवळपास सगळ्यांनाच आवडते. काहींना व्हेज मॅगी आवडते तर काहींना चीज मॅगी आवडते. काहींना एग मॅगी आवडते तर काहींना चिकन मॅगी. मॅगीचे विचित्र प्रयोग करतानाही तुम्ही अनेकांना पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला मॅगीसोबत असा अत्याचार करताना दिसत आहे. जो पाहून सोशल मीडिया यूजर्समध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या आवडत्या मॅगीचा असा प्रयोग पाहून लोक म्हणू लागले आहेत की, आता हा ग्रह सोडण्याची वेळ आली आहे. वास्तविक ही महिला आंब्याचा वापर करून मॅगी बनवताना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक मँगो शेक, आम पन्ना आणि मँगो चटणी खातात. पण मॅगीसोबत आंबा सर्व्ह केला तर तुमचा मूड बिघडतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की, बाई प्रथम एका मोठ्या तव्यावर मसाल्यासह मॅगी टाकते. यानंतर पाण्याऐवजी त्यात आंब्याचा रस टाकते. शेवटी त्या महिलेने पिकलेले आंबे घालून मॅगी सर्व्ह केल्याचे पाहून इंटरनेट वापरकर्त्यांना प्रचंड राग आला आहे. (हेही वाचा - Bride Groom Viral Video: नवरीला पाहून नवरा मुलगा घाबरला; गळ्यातला हार तोडून काढला पळ, सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ)

व्हिडिओ पहा-

या व्हिडिओने इंटरनेट युजर्संना खूपच दु:ख झालं आहे. द ग्रेट इंडियन फूडी नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. हेच बघायचं राहिलं होतं, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ पाहून आता मॅगी खाऊ शकणार नाही, असे म्हटले आहे.