Andhra Pradesh: महिलेने बांधले आपल्या मृत नवऱ्याच्या स्मरणार्थ बांधले मंदिर, बायकोकडून रोज केली जाते पूजा
Woman in Andhra Pradesh builds temple in memory of her dead husband (Photo Credits-ANI)

Andhra Pradesh:  खरं प्रेम कधीच विसरता येत नाही असे नेहमीच बोलले जाते. याच पार्श्वभुमीर आंध्र प्रदेशातील एका 43 वर्षीय पद्मावती नावाच्या महिलेने आपल्या मृत नवऱ्याच्या स्मरणार्थ मंदिर उभारल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आता सर्वत्र वेगाने पसरली असून याबद्दच चर्चा केली जात आहे. पद्मावती हिने असे म्हटले की, तिने तिच्या परिवारातील महिलांना आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करतात. तर पद्मावती हिच्या नवऱ्याचे 2017 मध्ये रस्ते अपघातात निधन झाले. हा धक्का ती पचवू न शकल्याने तिने नवऱ्याच्या स्मरणार्थ मंदिरच उभारले.

पद्मावती हिचा नवरा अंकी रेड्डी याच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या मंदिरात ती नेहमीच पूजा करण्यासाठी जाते. ऐवढेच नाही खास सणाच्या वेळी सुद्धा प्रसाद सुद्धा मंदिरात घेऊन येते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये, नवऱ्याच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या मोठ्या पुतळ्याची ती पूजा करताना दिसून येत आहे.(MP Love Affair After Marriage: लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नी पडली दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात, पतीला कळताच लावून दिले लग्न)

Tweet:

नवऱ्याच्या पुतळ्याला रंगीत फुलांच्या माळा घातल्याचे दिसून येत आहे. तर महिलेच्या नवऱ्याच्या पुतळ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने तिच्या प्रेमाचे कौतुक केले आहे. तर एका युट्युबरने कमेंटमध्ये असे म्हटले की, प्रत्येक परिवाराने असेच केले पाहिजे. म्हणजे घरीच प्रार्थना करावी. "माझे पती माझ्या स्वप्नात दिसले होते. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांनी मला त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास सांगितले." पद्मावती हिने म्हटले आहे.