Florida: वन्यजीव अधिकाऱ्यांनी कारच्या इंजिनमधून केली 10 फूट लांबीच्या अजगराची सुटका; पहा व्हायरल व्हिडिओ
Florida Python viral video (Photo Credit - Twitter)

Florida: फ्लोरिडा वन्यजीव अधिकाऱ्यांनी कारच्या इंजिनमधून 10 फूट लांबीच्या अजगराची (Python) सुटका केली आहे. हा अजगर बर्मीज प्रजातीचा असून तो फोर्ड मस्टँग कारच्या इंजिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस होत आहे. फ्लोरिडा फिश अ‍ॅन्ड वाइल्डलाइफ कंझर्वेशन कमिशन (Florida Fish and Wildlife Conservation Commission) च्या फेसबुक पेजवरील पोस्टनुसार, गुरुवारी फ्लोरिडाच्या दनिया बीचमधील कारच्या इंजिनच्या डब्यात घुसलेल्या अजगराला काढण्यासाठी वन्यजीव अधिकाऱ्यांना बोलविण्यात आलं होतं.

या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, "निळ्या रंगाच्या मस्टँग कारच्या इंजिनच्या हुडमध्ये घुसलेल्या अजगराला काढण्यासाठी आम्हाला फोन आला. त्यानंतर आमचे अधिकार तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीच्या इंजिनमधून सुरक्षितरित्या अजगराची सुटका केली. सुमारे 10 फूट लांबी असलेला हा अजगर खूपचं आक्रमक होता. या अजगराने पक्षी किंवा सस्तन प्राण्यांची शिकार केली असती. परंतु, नागरिकांनी आम्हाला वेळेवर यासंदर्भात माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद." (हेही वाचा - Anaconda Viral Video: ब्राझीलमध्ये नदी पार करणाऱ्या 50 फूट एनाकोंडा चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे यामागचं सत्य)

सीएनएनच्या अहवालानुसार, मॉर ब्ल्यूमेनफेल्ड (Maor Blumenfeld) नावाच्या व्यक्तीने इंजिनमधून अजगर काढताना वन्यजीव अधिकाऱ्यांचा व्हिडिओ शूट केला. तसेच दुसर्‍या व्यक्तीने अजगराला बॅगमध्ये ठेवण्यास मदत केली. सीएनएनशी बोलताना, एफडब्ल्यूसीचे प्रवक्ते कार्ली सेगेलसेन यांनी सांगितले की, या अजगराचा वापर शैक्षणिक आणि आउटरीच प्राणी म्हणून केला जाईल.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर एका 8 फूट अजगरामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती. हा आठ फूट लांबीचा अजगर पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारच्या चाकात जाऊन बसला होता. त्यानंतर महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशनच्या सर्पमित्रांने या अजगराची सुटका केली होती.