Insta Maids | X@UC and Pixabay.com

होम सर्व्हिस कंपनी Urban Company ने नुकतीच 15 मिनिटांत 'मेड बुकिंग' ही नवी सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा मुंबई मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. यामध्ये घरकामांसाठी बाई हवी असल्यास 15 मिनिटांत तिची बूकिंग होणार आहे. घरातील केरकचरा, लादी पुसणं, भांडी घासणं आदी कामांसाठी आता तिची मदत घेऊ शकतात. मुंबई सारख्या धकाधकीच्या शहरामध्ये कामाला बाई मिळणं आणि टिकणं हे आव्हान असतं. अनेकदा आयत्यावेळी बाईने कामाला दांडी मारली तर घरात कामाचा ठीग उभा राहतो. मग अशावेळी घरातली कामं हातावेगळी करण्यासाठी हाऊस हेल्प आता अर्बन कंपनी वर मिळणार आहे.

अर्बन कंपनीने याबाबत दिलेल्या जाहिरातीवरून मात्र सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्बन कंपनीच्या जाहिरातीमध्ये “Sunita maid" असा उल्लेख करण्यात आला आहे. पण हे 'मेड' शब्दचं अनेकांना खटकला आहे.

नेटकर्‍यांचा नेमका आक्षेप कशावर?

'मेड' हा शब्द आपत्तीजनक असल्याची भावना काही यूजर्सनी बोलून दाखवली आहे. 'मेड' हा शब्द हिणवणारा आहे. तसेच वर्गवाद करणारा आहे असे काही एक्स युजर्सनी म्हटलं आहे. काही युजर्सनी अशी सेवा सुरू केली तर नकळत बेकायदेशीर स्थलांतरित आपले पाय रोवतील अशी भीती व्यक्त केली आहे. यामध्ये बांग्लादेशी, नेपाळी बेकायदेशीर स्थलांतरित काम करत असल्याचे तुम्हाला आढळण्याची शक्यता जास्त आहे. असेही एका युजरने म्हटलं आहे.

अर्बन कंपनीचा प्रतिसाद काय?

अर्बन कंपनीने सांगितले की त्यांना मुंबईत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे खूप आनंद झाला आहे, परंतु त्यांच्याकडून थोडीशी सुधारणा करण्यात आली आहे. त्यांच्या नव्या पोस्टमध्ये “इंस्टा मेड्स / इंस्टा हेल्प” चा वापर करून, सेवा कंपनीने लिहिल आहे की “मुंबईमध्ये आमच्या नव्याने सुरू झालेल्या सेवेला मिळालेल्या प्रचंड सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. सध्या, ही सेवा त्याच्या पायलट टप्प्यात आहे आणि आम्ही लवकरच इतर शहरांमध्ये ती सुरू करण्यास उत्सुक आहोत.

कंपनी त्यांच्यासोबत काम करणार्‍यांना मोफत आरोग्य विमा आणि महिन्याला 132 तास काम केल्यास 20,000 रुपये निश्चित उत्पन्न देणार आहे असा दावा केला आहे.

लवकरच अर्बन कंपनीचा आयपीओ देखील बाजारात येणार आहे. सध्या Snapbbit हे ऑन डिमांड घरकामासाठी सेवा देत आहे. Zepto’s chief of staff Aayush Agarwal, यांनी सुरू केलेल्या Snapbbit ने अलीकडेच सिरीज ए राउंड फंडिंगमध्ये $5.5 million जमा केले आहेत, असे मनीकंट्रोलच्या एका अहवालात म्हटले आहे.