सध्या हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील एका पांढऱ्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण हा दुर्मिळ प्रजातीचा साप असल्याचे सांगत आहेत. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओमध्ये जो पांढरा साप दिसत आहे तो काही दुर्मिळ प्रजातीचा नाही. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्वचेचा आजार झाल्यावर त्याचे शरीर पांढरे पडते तसेच या सापाच्या बाबतीत घडले असावे. हा व्हिडिओ चंबा जिल्ह्यातील कोणत्या भागातील याचा शोध घेण्याचा वनविभाग प्रयत्न करत आहे. पांढऱ्या रंगाचे साप क्वचितच दिसत असल्याचे वनविभागाचे मत आहे.

माहितीनुसार हा अल्बिनो साप असल्याचे सांगितले जात आहे, जो क्वचितच दिसतो. एका अहवालानुसार, हा साप पाच फूट लांब होता. या व्हिडीओमुळे स्थानिकांमध्ये भीती आणि कुतूहल निर्माण झाले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी पुण्यात अल्बिनो साप दिसला होता. (हेही वाचा: Cobra Snake Inside Man's Shirt: झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टमध्ये शिरला भलामोठा साप, जाणून घ्या काय घडले पुढे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)