झोपाळ्यावरुन महिला खाली पडल्या ( Photo - Twitter )

जमिनीपासून हजारो फूट उंचीवर झोपाळा घेऊन झोके घेणे खूपच रोमांचक असू शकते, परंतु हे असे करत असताना छोटी चूक ही खुप भारी पडू शकते. याचेच एक ताजे उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.महिला झोके घेत असताना झोपाळ्याची साखळी अचानक तुटली, ज्यामुळे महिला झोपाळ्यावरुन खाली पडल्या. मात्र, या अपघातात दोघीही जास्त जखमी झाल्या नाहीत ही दिलासादायक बाब आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. (पुण्याच्या दिवे घाट भागात विनामास्क गाडीच्या बोनेट वर बसून नवरीचं फोटोशूट, लग्नमंडपाकडे कूच; पोलिसांनी Viral Video पाहून केली कारवाई )

डेली मेलच्या वृत्तानुसार, दोन महिला झोपाळ्यावर  झोके घेत असताना झोपाळ्याची साखळी तुटली ज्यामुळे झोका घेणाऱ्या दोन्ही महिला खुप उंचावरून खाली पडल्या आणि जखमी झाल्या. जमिनीपासून हजारो फूट उंचीवरुन खाली पडल्यानंतर, स्त्रिया मरतामरता वाचल्या आहेत आणि त्यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, महिला झोका घेत असताना अचानक हवेत जाताच झोपाळ्याची साखळी तुटते ज्यामुळे त्या महिला खाली पडतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सुरक्षेमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली याचा शोध घेणे सुरू केला आहे.