पाद्र्यीने खेळला गरबा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
(Photo Credit: Twitter)

नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवातील दांडीया आणि गरब्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, त्यातील काही असे हटके आहेत की, पाहणाऱ्याची नजर खिळून राहते. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक पाद्री गरबा खेळताना दिसतो आहे. मायक्रोब्लॉगिंग नावाच्या एका साईट्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. शोशल मीडियावर नेटझन्सच्याही हा व्हिडिओ चांगलाच पसंतीस आला आहे.

प्राप्त माहितीनुसार क्रिस्पिनो डिसूजा असे या पाद्री मोहदयाचे नाव असून, ते माटूंगा येथील डॉन बॉस्को स्कूलमधील शिक्षक असल्याचे समजते. सुरेंद्र शेट्टी नावाच्या व्यक्तिने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. क्रिस्पिनो डिसूजा ज्या ग्रूपसोबत गरबा खेळत आहेत त्या ग्रूपचे नाव 'दांडिया धमाका' असे आहे. दरम्यान, अनेक लोकांनी पाद्री महोदयांवर टीका केली आहे. तर, काहींनी त्यांचे कौतुक केले आहे. काहींचे म्हणने असे की, एक पाद्री हिंदू सणांमध्ये कसे काय सहभाही होऊ शकतो. तर, काहींचे म्हणने असे की, भारत हा विविधतेत एकता ठेवणारा देश आहे. त्यामुळे पाद्रीचे गरबा खेळणे हे कौतुकास्पद आहे. (हेही वाचा, कंट्रोल.. उदय.. कंट्रोल! केजरीवाल यांच्यावरचे हे स्पूफ पाहून तुम्हीही हसाल खळखळून (व्हिडिओ))

दरम्यान, नवरात्र उत्सव नुकताच संपला आहे. असे असले तरी, अद्यापही नवरोत्रोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गरबा आणि दांडीया खेळला जात आहे.