Deepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या फोटोजची प्रतिक्षा; मीम्स व्हायरल
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Photo Credits : Facebook)

बॉलिवूडचे स्टार कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल इटलीत विवाहबंधनात अडकले. मात्र दीपवीर विवाहसोहळ्याचे फोटोज काही चाहत्यांना पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे चाहते काहीसे निराश झाले असले तरी या फोटोजची उत्सुकता चाहत्यांच्या मनात कायम आहे. फोटोची प्रतिक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मजेदार मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवविवाहित दांपत्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. पण ही उत्सुकता काही वेळच ताणून धरावी लागणार आहे. कारण आज सिंधी पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर दीपवीर सोशल मीडियावर फोटोज शेअर करणार आहेत.