Tug of War vs a Lion Video: सिंह खेळतोय रस्सीखेच; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
vs a Lion Video | (Photo Credit - instagram)

रस्सीखेच (Tug Of War) हा खेळ केवळ माणसालाच आवडतो असे नाही बरं! तो प्राण्यांनाही आवडू शकतो आणि त्यातही खास करुन सिंहाला. होय,सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, एक सिंह चक्क रस्सीखेच (Tug of War vs a Lion Video) खेळतो आहे. हा सामना एका प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी आणि सिंह यांच्यात झाला. jayprehistoricpets नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. तो लाईक केला आहे आणि त्यावर काही उत्साही वापरकर्त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.

सिंहासोबत रस्सीखेच खेळ खेळणाऱ्या व्यक्तीचे नाव जय ब्रेवर असे आहे आणि तो प्राणीसंग्रहालयाचा रक्षक आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजला आहे. रस्सीखेच खेळामध्ये खेळाडू थेट मैदानात असतात पण इथे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन सिंह पिंजऱ्यात पण रिकाम्या जागेत आहे. पिजऱ्याला असलल्या एका गोल छिद्रातून एक जाड आणि लांब रश्शी आतमध्ये सोडली आहे. जी सिंहाने आपल्या जबड्यात पकडली आहे तर दुसऱ्या बाजूला जय ब्रेवर ती खेचतो आहे. सिंह आणि ब्रवर यांच्यात बराच काळ खेचाखेची सुरु राहते पण अखेर सिंह जिंकतो. ब्रेव्हर आपली हार मान्य करतो आणि लॉस्ट असा बोर्ड हातात घेतो. (हेही वाचा, Viral Video : घरात घुसून सिंहिणीनं केली कुत्र्याची शिकार; थरारक व्हिडीओ व्हायरल (Watch Video))

इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून पुढच्या काहीच तासात या व्हिडिओने तब्बल तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 15,000 लाईक्स मिळवले आहेत. सोशल मीडियावर व्हारल झालेला हा मनमोहक व्हिडिओ प्राणी आणि मानव यांच्यातील मजेशीर संघर्ष दर्शवतो. याशिवाय सिंहामध्ये असलेली ताकद आणि त्याची आक्रमक वृत्तीही या निमित्ताने पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राणिसंग्रहालयात राहिला म्हणून सिंह आपली आक्रमकता मुळीच विसरत नाही. त्याचा गुण तो पिंजऱ्यात बंद असला तरीही कायम ठेवतोहे विशेष या ठिकाणी अधोरेखीत होते. (हेही वाचा, Crocodile Attacks Video: मगरीचा हल्ला, जबड्यातून थोडक्यात बचावला कर्मचारी; प्राणीसंग्रहालयातील घटना, व्हिडिओ व्हायरल)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Jay Brewer (@jayprehistoricpets)

दरम्यान, प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांसोबत केले जाणारे वर्तन अनेकदा मोठ्या दुर्घटनेस कारणही ठरते. अलिकडेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार एका मगरीने प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हा कर्मचारी एका नाईल मगरीला काटीने ढोसलत होता आणि तिच्याशी मस्ती करण्याच्या प्रयत्नात होता. सुरुवातीला अतिशय शांत असलेली मगर अचानक आक्रमक झाली आणि तीने हल्ला चढवला. ज्यामध्ये कर्मचाऱ्याचा पाय तिच्या जबड्यात आला. केवळ अपवाद म्हणून त्याचे प्राण वाचले पण तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे अशा व्यन्य प्राण्यांशी वर्तन करताना सावधानता बाळगणे केव्हाही चांगले.