Viral Video: 'प्रेमाला वयाचं बंधन नसतं' म्हणत 21 वर्षांच्या मुलाने बांधली 52 वर्षीय पत्नीसोबत लगीनगाठ; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल (Watch Video)
Viral Wedding | Screengrab From Viral Video

प्रेम आंधळं असतं हे अनेकदा तुम्ही ऐकलं, वाचलं असेल कधीतरी गंमतही उडवली असेल. पण हे वाक्य खरं करत एका 21 वर्षीय मुलाने आपल्या पेक्षा 31 वर्ष मोठ्या म्हणजे 52 वर्षीय महिलेसोबत लग्न केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही पण मुलाने आपलं तिच्यावर प्रेम आहे आणि त्यामधूनच लग्न केलं आहे. तर 52 वर्षीय वधूला वयाच्या या टप्प्यावर आल्यावर खरं प्रेम गवसलं आहे त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार ही जोडी मागील 2-3 वर्ष एकमेकांच्या ओळखीमध्ये आहे. त्यानंतर ते रिलेशनमध्ये होते. आता अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या जोडीची सोशल मीडीयामध्ये चर्चा होत आहे आणि व्हिडिओ देखील वायरल होत आहे. नक्की वाचा: Self-Marriage: तरुणीचे स्वत:सोबतच लग्न, गुजरातमधील क्षमा बिंदू हिच्यामुळे समाजात नवा ट्रेण्ड? नवऱ्याशिवाय बोहल्यावर चढणाऱ्या मुलीची ही कहाणी .

पहा वायरल व्हिडीओ

व्हिडीओ मध्ये एका व्यक्तीने त्यांनी लग्न केलं आहे का? असा प्रश्न विचारला असता त्याने आपलं वय 21 आणि पत्नीचं वय 52 असल्याचं म्हटलं आहे. तर प्रेमाला वयाचं बंधन नसल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यांच्या कुटुंबाचा लग्नाला पाठिंबा नसल्याचं त्याने म्हटलं आहे.   दरम्यान नेटकरी देखील आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यावर एकाने 'यांचा वरमाला सोहळा संपन्न होताच कलियुगाचा अंतिम टप्पा सुरू झाला' असं म्हटलं आहे. तर अन्य युजरने मुलगा साक्षर दिसतोय पण आंटीच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन लग्न केल्याचं दिसतय' असं देखील म्हटलं आहे.