Viral Video: इंटरनेटच्या या युगात लोकांना सोशल मीडियाचे इतके व्यसन लागले आहे की ते रील बनवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. सोशल मीडियावर दररोज अनेक धोकादायक आणि रोमांचक व्हिडिओ दिसत असतात आणि व्हायरल होत असतात, ज्यामध्ये लोक रिलसाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. लोक कधी धोकादायक स्टंट करतात तर कधी त्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी जीव धोक्यात घालतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पुरुषाने स्वतःला जमिनीखाली गाडले आणि एक महिला त्याला खायला घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना म्हणायला भाग पडते की, हे रील बनवण्याचं कसलं वेड आहे. हा व्हिडिओ X वर @ChapraZila नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 592.6k व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे- रीलांमुळे लोक वेडे झाले आहेत, आता ते विष बनले आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे- या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकार आणि समाज दोघांना मिळून उपाययोजना कराव्या लागतील, तर दुसऱ्याने लिहिले आहे – स्त्री 2 चा परिणाम आहे. हे देखील वाचा: Viral Video: सीट मिळवण्यासाठी खिडकीमधून बसमध्ये चढली महिला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
रील बनवण्यासाठी माणसाने स्वतःला जमिनीखाली गाडले
शहरों वाला Reels का लत अब गांव तक पहुंच गया हैं, कुछ भी कर रहे है लोग 🥺 pic.twitter.com/4SrCmwXVtR
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) August 14, 2024
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक माणूस जमिनीत खोलवर गाडलेला दिसत आहे, तर त्याच्या शेजारी बसलेली एक महिला त्याला खाऊ घालत आहे. या व्यक्तीने रीलसाठीचे वेड पाहून लोक दंग झाले आहेत. अनेकांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून लोक आता रीलच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी मर्यादा ओलांडत आहेत. यासोबतच रिल्सचा गैरवापर करणे आणि त्यामध्ये अश्लील किंवा धोकादायक कृत्यांना प्रोत्साहन देणे हे नैतिकतेच्या विरोधात असून समाजासाठी हा गंभीर विषय बनत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.