O SHETH: ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट!, राजकीय ट्रोलिंगसाठी व्हायरल गाण्याचा वापर, प्रसारमाध्यमांसह नेटीझन्सनाही पडली भूरळ
O SHETH | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' हे गाणं ( O SHETH Song) पाठीमागील काही दिवसांपासून सोशल मीडिया ( Social Media), युट्यूब आणि अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरही झळकते आहे. या गाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काहींनी राजकीय ट्रोलिंग (Political Trolling) करण्यासाठी या गाण्याचा वापर केला आहे. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांनाही या गाण्याची भूरळ पडल्याने अनेकदा बातम्यांच्या शिर्षकांमध्येही गाण्याची पंचलाईन खुबीने वापरली जात आहे. हे गाणं नेमकं कोणाला डोळ्यासमोर ठेऊन लिहिलं गेलं आहे? असाही सवाल काहींनी उपस्थित केला. दरमयान, या गाण्याचे लेखक, गायक आणि निर्मात्यांनी आपण हे गाणं कोणालाही नजरेसमोर न ठेऊन नव्हे तर निष्पक्षपणे लिहिल्याचे म्हटले आहे.

गाण्याचे नाव 'ओ शेठ' असे असून हे गाणे डीजे रिमिक्स (O Sheth DJ Remix) आहे. उमेश गवळी यांनी हे गाणे गायले आहे. तर गाण्याचे बोल संध्या हिने लिहिले असून ते प्रणिकेतने संगीतबद्ध केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे गाणे इतके धुमाकूळ घालत आहे की, लोक या गाण्याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून व्हाट्सअॅपला स्टेटसही ठेऊ लागले आहे. काही लोक ट्विटरवर हटके ट्विट करुन त्यासोबत 'ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' हा हॅशटॅगही ठोकत आहेत. काहींनी राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासाठी या गाण्याचा वापर सुरु केला आहे. 'जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, 'नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट', असे या गाण्याचे बोल आहेत.

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

टविट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

व्हिडिओ

अनेकांनी हे गाणं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेट केले आहे. राज्यात आणि देशात वाढत असलेली महागाई, वाढते पेट्रोल डिझेलचे दर यांवरुन सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. काहींनी तर पेट्रोल पंपावर पंतप्रधानांचा फोटो दिसला तर त्याला नमस्कार सुरु करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, काहींनी हे गाणं बॅग्राऊंडला ठेऊन पुढे पंतप्रधानांची प्रतिमा लावूनही महागाई, बेरोजगारी आदींवरुन प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याच्या निर्मात्यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अथावा इतर कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीकाटिपण्णी करण्यासाठी हे गाणं आपण तयार केले नसल्याचे म्हटले आहे.