Vinayak Chaturthi 2022: संत्र्यांची राजधानी हॉलंडमध्ये विनायक चतुर्थी साजरी केली जात असल्याचा दावा करणारे अनेक ट्विटर युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तथापि, सत्य हे आहे की हा एक जुना व्हिडिओ आहे. हा व्हायरल व्हिडिओ 16 फेब्रुवारी 2018 रोजी दक्षिणपूर्व फ्रान्समधील मेंटन येथे 85 व्या लेमन फेस्टिव्हलच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाचा आहे.
जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल होत आहे.
Holland is said to be the capital of orange in the world.
See how they celebrate Vinayaka Chaturthi pic.twitter.com/s6z0lEffQ8
— Anu Satheesh 🇮🇳 (@AnuSatheesh5) September 3, 2022
तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की, हा व्हिडिओ जुना व्हिडिओ आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ 2018 मधला असून व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या ठिकाणाची दिशाभूल करणारी आहे. लिंबू आणि संत्र्यापासून बनवलेले गणपतीचे शिल्प दुसऱ्या ठिकाणचे आहे.
See original post:
A worker on a mobile elevating platform checks a sculpture of Hindu deity Ganesh, made of lemons and oranges, on the eve of the 85th Lemon Festival, in Menton, southeastern France, on February 16, 2018. The 'Bollywood' themed festival runs from February 17 to March 4, 2018. pic.twitter.com/FupwdoAeJx
— PO BAG 1 (@pobag1) February 17, 2018
2018 मध्ये आग्नेय फ्रान्समधील मेंटन येथे 85व्या लेमन फेस्टिव्हलच्या पूर्वसंध्येला गणपतीचे शिल्प तयार करण्यात आले होते. हा कार्यक्रम 16 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आला होता. अहवालानुसार, 'बॉलीवूड' थीम असलेला महोत्सव 17 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)