Illegal Cow Slaughter In Unnao: उन्नाव (Unnao) मधील कथित बेकायदेशीर गोहत्ये (Cow Slaughter) चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. हा व्हिडिओ @shubhamsinghupp या यूजरने अपलोड केला आहे. ज्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) हे माता गायींची सेवा करताना दिसत आहेत, तर उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील दाही पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या कत्तलखान्याचा हा व्हिडिओ आहे. महाराज कत्तलखान्यांकडे लक्ष द्या.
दरम्यान, हा व्हिडिओ पोस्ट करताना एक्स वापरकर्त्याने उन्नाव पोलिसांना टॅग केल्यानंतर, उन्नाव पोलिसांनी देखील ट्विटरवर या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचे आश्वासन देत व्हिडिओला प्रतिसाद दिला. उन्नाव पोलिसांनी सांगितले की, दाही पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षकांना व्हायरल व्हिडिओची तपासणी केल्यानंतर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा -Potholes On Ram Path: पहिल्याच पावसात अयोध्यातील रामपथावर 13 खड्डे, 6 अभियंते निलंबित; गुजरातच्या कंपनीला पाठवण्यात आली नोटीस)
पहा व्हिडिओ -
UP: After Purported Video Of Alleged Illegal Cow Slaughter In Unnao Goes Viral, Police Initiate Probe#UttarPradesh #Cow #Animal #Illegal pic.twitter.com/xG5uABQsj0
— Free Press Journal (@fpjindia) June 29, 2024
व्हिडिओची सत्यता तत्काळ पडताळली जाऊ शकली नाही. परंतु, उन्नाव पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेल्या कृतींबाबत अधिक तपशील मिळविण्यासाठी तपास सुरू केला आहे.