Twosday 2022 दुर्मिळ योगायोग; Palindrome आणि  Ambigram असणारी आजची तारीख 22/02/2022 का खास? जाणून घ्या पुढील 10 वर्षांमधील Palindrome Dates!
टूजडे । PC: File Photo

जगात अनेक अचंबित करणार्‍या गोष्टी आहेत. आजचा दिवस आणि तारीख देखील अशाच थक्क करणार्‍या आणि अगदी स्पेशल पॅटर्नचा एक प्रकार आहे. आजच्या तारखेमध्ये एक दुर्मिळ योगायोग आहे. आजचा हा दिवस Twosday आहे. मंगळवारी आज तारीख 22 फेब्रुवारी 2022 अशी आहे. तारखेचं आजच स्वरूप हे palindromic pattern म्हणून ओळखलं जातं. यामध्ये तारीख कोणत्याही बाजूने पाहिली तरीही ती सारखीच आहे. ही palindromic date, Tuesday ला येत असल्याने Twosday अशी ती संबोधली जात आहे.

Twosday हीच केवळ स्पेशल तारीख नाही. पुढील काही वर्षात अशा palindrome तारखा खूप येणार आहेत. 21 व्या शतकामध्ये यंदा एकूण 38 palindrome dates आहेत. यामध्ये महिना-दिवस-वर्ष या स्वरूपातील तारखेचा पॅटर्न सारखाच असेल.  पहा त्या कोणत्या?

पहा पुढील 10 वर्षांमधील Palindrome Dates!

  1. मार्च 20, 2023 - 03/02/2023
  2. एप्रिल 20, 2024 - 04/20/2024
  3. मे 20, 2025- 05/20/2025
  4. जून 20, 2026 - 6/20/2026
  5. जुलै 20, 2027 - 07/20/2027
  6. ऑगस्ट 20, 2028 - 08/20/2028
  7. सप्टेंबर 20, 2029 - 09/20/2029
  8. मार्च 2, 2030 - 03/02/2030
  9. जानेवारी 30, 2031 - 01/30/2031
  10. मार्च 30, 2033 - 03/30/2033

आजची TwosDay date ही ambigram देखील आहे. ambigram म्हणजे या तारखेची मिरर इमेज देखील सारखीच दिसणार आहे. त्यामुळे उलट सुलट आणि वर खाली अशा दोन्ही स्वरूपात आजची तारीख सारखीच दिसणार आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा संपूर्ण आठवडा पुढे आणि मागे सारखा आहे म्हणून आपण त्याला 'पॅलिंड्रोम वीक' (Palindrome Week) म्हणून संबोधू शकतो