Turkish Ice-Cream Vendor Viral Video: विक्रेत्याच्या गमतीमुळे वैतागला ग्राहक, संतप्त पद्धतीने खाल्ले आईस्क्रीम (पाहा व्हिडिओ)
Turkish Ice-Cream Vendor | (Photo Credit - Twitter)

तुर्की आइस्क्रीम विक्रेते (Turkish Ice-Cream Vendor Viral Video) इंटरनेटच्या माध्यमातून जगभरामध्ये लोकप्रिय झाले आहेत. आईसक्रीम विक्री करताना ते ज्या पद्धतीने लोकांशी फिरकी घेतात, मजा करतात त्यामुळे ते लहान मुलांमध्येही प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ आईस्क्रीम विक्रेत्याची चलाखी दाखवणारा नव्हे, तर त्याच्या चलाकीला वैतागून ग्राहकाने केलेल्या वर्तनाचा आहे.सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तुर्की आइस्क्रीम विक्रेत्यांनी आपल्या अनोख्या शैलीसाठी जगभरात नाव कमावले आहे. व्हॅनिलाचा स्कूप देऊन ग्राहकांना चिडवण्यापासून ते आईस्क्रीम कोन टाकण्याचे नाटक करण्यापर्यंत.आपण सर्वजण त्यांच्या कृतींबद्दल परिचित आहोत. परंतु आपल्यापैकी बहुतेकजण अजूनही त्यांच्या आईस्क्रीम सर्व्ह करण्याच्या शैलीपूढे हात टेकतात. इंटरनेटवर बरेच व्हिडिओ आहेत ज्यात आम्ही पाहतो की तुर्की आइस्क्रीम विक्रेत्याने प्रेक्षकांना फाटा देत लोकांची खिल्ली उडवली आहे. परंतु असे काही आहेत जे विक्रेत्याकडून फसवणूक करुन घेण्यास नकार देतात आणि आणखी आनंददायक काहीतरी करतात! असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका व्यक्तीने विक्रेत्याच्या खेळकरपणावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर त्याने चक्क विक्रेत्याचा हात पकडून स्वत:च आईस्क्रीम खायला सुरुवात केली आहे. (हेही वाचा, International Ice Cream Day 2020: आईस्क्रीम खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून तंदुरुस्त राहण्यापर्यंत होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे नक्की वाचा )

ट्विट

ट्विटरवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिोमध्ये पाहायला मिळते की, एक तुर्की आइस्क्रीम विक्रेता पुरुषासोबत नेहमीच्या कृप्त्या करताना दिसत आहे. ग्राहक योग्य क्षणाची वाट पाहतो आणि नंतर लगेचच आइस्क्रीम विक्रेत्याचा मोठा चमचा एका बाजूने दुसर्‍या बाजूला हलवण्याआधी झटपट पकडतो. त्यानंतर तो थेट चमच्याने आईस्क्रीम खाण्यासाठी पुढे जातो. आजूबाजूच्या लोकांनाही ग्राहकाची ही कृती फारच आवडते. नंतर विक्रेता विक्रेता त्याला नंतर एक टिश्यू देखील ऑफर करतो. पण तो या टिश्यूचा स्वीकार काहीशा रागातच करतो आणि तो टीश्यू हिसकावून घेतो. आपण हा व्हिडिओ इथे पाहू शकता.