Photo Credit: X

Lucknow Viral Video:लखनौमधील ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरातील टाऊन हॉल पब्लिक स्कूलचे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. फुटेजमध्ये प्रीती रस्तोगी नावाची शिक्षिका एका मिनिटात पाचवीच्या विद्यार्थ्याला सतत आठ वेळा कानाखाली मारताना दिसत आहे.घटनेनंतर मुलाच्या कानातून रक्त आले आणि त्याच रात्री त्याला तापही आला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी याप्रकरणी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरगंज पोलीस स्टेशन भागातील न्यूगंज परिसरात टाऊन हॉल पब्लिक स्कूल आहे. येथे याच भागातील एक मुलगा इयत्ता पाचवीत शिकतो. मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, इंग्रजी शिक्षिका प्रीती रस्तोगी यांचा वर्ग सुरू होता आणि ती मुलांची असाइनमेंट तपासत होती. मुलाच्या वहीत 'पाणी' ऐवजी 'ओले' (wet) लिहिले होते. यामुळे प्रीती रस्तोगी चांगलीच संतापली.हेही वाचा: Baby Boy Born with 25 Fingers in Karnataka: कर्नाटकात जन्माला आले हाताला 13...पायाला 12 बोटं असणारे बाळ

 

याबाबत मुलाशी बोलले असता, मुलाने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या आईने 112 वर डायल करून शाळा व्यवस्थापन तसेच पोलिसांना याची माहिती दिली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तक्रार मिळूनही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. शनिवारी सायंकाळी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. ज्यामध्ये शिक्षकाचे हे कृत्य पकडण्यात आले आहे. या घटनेवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.