आपली स्वत:ची एखादी महागडी स्पोर्ट्स बाईक असावी असे स्वप्न प्रत्येक बाईक प्रेमींचे असते. त्यामागे बाईक चालविण्याची आवड आणि प्रतिष्ठा हेच असते. परदेशातच अशा महागड्या बाईक्स बघायला मिळतात हे समीकरण आता बदलत चाललं आहे. आता भारतातही अशा महागड्या गाड्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा गाड्यांना बघून अनेकांच्या भुवया आपोआपच उंचावतात. त्या बाईकसोबत फोटो काढण्याचा काहींना मोह होतो. मग हा मोह पोलिसांना का बरं होणार नाही. तमिळनाडू (Tamil Nadu) पोलिसांचा असाच एक व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नाकाबंदीसाठी ऑनड्युटी असलेल्या पोलिसांनी BMW स्पोर्ट्स बाइक पाहून त्या बाईकस्वारासोबत जे केले ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
मुंबईहून तामिळनाडूमधील मदुराई येथे बाईकवरुन सोलो ट्रीपला निघालेल्या तरुणाने आपल्या RideWithKC या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पाहा व्हिडिओ
हेदेखील वाचा- Christmas 2019: Jingle Bells गाण्याचे पुणेरी व्हर्जन; नऊवारीतील चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर होतोय व्हायरल; Watch Video
या व्हिडिओमध्ये नाकाबंदीजवळ पोलिसांनी तरुणाला थांबवल्याचे दिसते. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाकडे कागदपत्रांची मागणी केली. त्याने आपल्या बीएमडब्ल्यू आर १२०० जीएस या स्पोर्ट्स बाईकची सर्व कागदपत्रे दाखवली. त्यानंतरही त्यांनी त्याला प्रश्न विचारणे सुरुच ठेवले. त्यानंतर काही वेळाने त्याच्या लक्षात आले की हे सर्व त्याची बाईक पाहण्यासाठी पोलीस हा सर्व प्रकार करत होते.
त्यानंतर त्यांनी त्या बाईकवर बसून फोटो देखील काढले. अर्थात त्या आधी त्यांनी या तरुणाला ‘गाडीवर बसून आम्ही एक फोटो काढू शकतो का?’ असं विचारत परवानगीही घेतली. या व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांनाही अशा महागड्या बाईकवर बसण्याचा मोह आवरला नाही असंच या व्हिडिओवरुन दिसत आहे.