मुंबई : तैमुर अली खान आणि त्याच्या निरागसतेचे अनेक चाहते इंटरनेटवर आहेत. मीडियादेखील तैमुरच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी कॅमेर्यात कैद करण्यासाठी आतुर असतात. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची सर्वत्र धूम आहे. मग यामध्ये तैमुर कसा मागे राहणार ? गणेशोत्सवात धमाल करताना तैमुरचे नवे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
तैमुरचा स्वॅग
मीडियाचे कॅमेरे असो किंवा अगदी खान, कपूर कुटुंबातील काही मंडळी.. तैमुरच्या अदा क्लिक करण्याचा मोह अनेकांना होतोच. करिना स्वतः सोशल मीडियापासून दूर आहे. मात्र गणेशोत्सवात नुकतीच ती आतेभावाकडे गेली होती. यावेळेस तैमुर पांढर्या सदरा आणि कुडत्यामध्ये आला होता.
View this post on Instagram
this baccha is the cutest human being #taimuralikhan #taimur #kareenakapoor #saifalikhan
करिनाचा आतेभाऊ आदिर जैनच्या घरी तैमुर खेळतानाचे फोटो आदिरने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यापूर्वी तैमूरचा रक्षाबंधनाच्या दिवशीही सदरा-कुडत्यातील लूकही सोशल मीडियावर अशाच प्रकारे झपाट्याने व्हायरल झाला होता.