बर्फाळ डोंगरावरुन कोसळला हिम बिबट्या, अंगावर काटा येईल असा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
Snow Leopard (Photo Credits: Twitter)

Viral Video: बर्फाची चादर पसरलेल्या डोंगरावरुन एखादा हिम बिबट्या खाली कोसळताना तुम्ही पाहिला आहे का? याची कल्पना करुनच हा प्रकार ही धक्कादायक असू शकतो असे मनात उद्धवते. मात्र सोशल मीडियात अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो तुम्ही पाहिल्यास तुमच्या अंगावर काटा जरुर उभा राहिल. व्हिडिओत असे दिसून येत आहे की, एक हिम बिबट्या आपली शिकार करण्यासाठी पळत आहे. मात्र अचानक त्याचवेळी तो खाली कोसळतो. हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुधा रामेनने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून मीडिया युजर्सकडून यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

सुधा रामेन यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर असे लिहिले आहे की, हिम बिबट्या हा लद्दाखचा राष्ट्रीय प्राणी आहे. ही क्लिप द सीक्रेट लाइव्स ऑफ स्नो लेपर्डची आहे. या क्लिपला क्रेटिड्स हे डॉक्युमेंट्री टीमला दिले आहे. मादा हिम बिबट्या शिकार करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी ब्लू शीप आणि हिम बिबट्या दोघे डोंगरावरुन खाली कोसळतात. या व्हिडिओला आतापर्यंत 44.3 हजार लोकांनी पाहिले आहे. तर 493 जणांनी व्हिडिओ रीट्विट आणि 2713 जणांनी लाईक्स केला आहे.(सफरचंद खरेदी करतानाचा आपल्या पार्टनर सोबतचा कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल Watch Funny Video)

Tweet:

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक हिम बिबट्या बर्फाळ डोंगरावर एका ब्लू शीपचा पाठलाग करत आहे. काही किलो मीटर त्याचा पाठलाग केल्यानंतर अचानक वेगाने बिबट्या त्याच्यावर हल्ला करण्यासाठी जाताना त्याचा तोल जात खाली पडतो. हा व्हिडिओ पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.