पाठीवर मसाज करायला इथे वापरले जातात साप ; मसाज चा व्हिडिओ पाहुन तुम्ही ही घाबराल
Photo Credit Twitter

तुम्हाला खुप स्ट्रेस आला असेल किंवा काम करुन तुम्ही खुप थकला असाल अशा वेळी एक मस्त बॉडी मसाज मिळाला तर तुम्ही एकदम छान फील करता.बाजारात असे बरेच स्पा आहेत जे तुमच्या बॉडी ला रिलॅक्स करण्यासाठी केले जातात.पण तुम्ही कधी 'स्नेक मसाज' बद्दल काही ऐकल आहे का?म्हणजे सापाचा वापर करुन केला जाणारा मसाज. हो, इजिप्तमध्ये (Egypt) मात्र ताण घालवण्यासाठी करण्याचा मसाज चक्क सापांच्या माध्यमातून केल्याचं समोर आले आहे.तुम्हाला हे ऐकून नक्कीच विचित्र वाटेल पण या सापांनी केलेल्या मसाजमुळे मांसपेशी आणि सांध्याचे दुखणे कमी होते.आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले होण्यास पण मदत होते. (धक्कादायक ! केनियाच्या मुलींबरोबर सेनेटरी उत्पादनांच्या बदल्यात ठेवले जातात जबरदस्तीचे लैंगिक संबंध)

स्पामध्ये क्लायंट म्हणून आलेल्या दिया झेन यांनी सांगितलं, "मला या मसाजबाबत इंटरनेटवर वाचायला मिळालं. मी हा मसाज ट्राय करायला इकडं आलो. सापांना माझ्या पाठीवर सोडलं गेलं तेव्हा मला मस्त निवांतपणाचं फिलिंग आलं. आराम मिळाला. आधी मी घाबरलो होतो. पण साप माझ्या पाठीवर फिरू लागले तेव्हा भिती कुठल्याकुठं पळून गेली आणि एकदम छान, तणावमुक्त वाटायला लागलं."

ट्विटर वर या स्नेक मसाज चे व्हिडिओ पहायला मिळत आहे. मात्र त्याच्या कमेण्टवरून लक्षात येतय की लोकांना स्नेक मसाज ही कल्पना जास्त आवडलेली दिसत नाहीये. बहुतेकांना हा पैशाचा अपव्यय वाटतो आहे. तर काहींचं म्हणणं आहे, की यामाध्यमातून माणसानं सापांना त्रास देण्याचा आणखी एक मार्ग शोधून काढला आहे.परंतु काही जण हा मसाज ट्राय करायला हवा अशी ही प्रतिक्रिया देत आहेत.