Shiva Tandava Stotra: वाद्यांशिवाय शिवलिंगासमोर गायले ‘शिव तांडव स्तोत्र’; श्री कालिचरण महाराजांनी केलेली भगवान शिवाची स्तुती ऐकून अंगावर येईल काटा (Watch Video)
Kalicharan Maharaj Shiv Tandav Strotram (Photo Credits: Wikimedia Commons and Video Grab)

सध्या देशातल्या काही राज्यांमध्ये श्रावण (Sawan 2020) महिना सुरु झाला आहे. यंदा श्रावणातल्या अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली असली तरी, शिवाची पूजा-अर्चना-उपासना लोक घरीच आपापल्या परीने करत आहेत. आता भोपाळ शहराजवळील भोजपुर स्थित प्राचीन भोजेश्वर शिव मंदिरामधील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सावन महिन्यात आशियातील सर्वात मोठ्या शिवलिंगासमोर तिथले पुजारी, श्री कालिचरण महाराजांनी (Shri Kalicharan Maharaj) गायलेल्या शिवाच्या स्तुतीबद्दलचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये रावणाने रचलेला शिव तांडव स्तोत्र (Shiva Tandava Stotra) एका ठराविक तालीत गायला आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या व्हिडिओमध्ये कोणत्याही वाद्यशिवाय शिवाची स्तुती केली गेली आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हालाही हा व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरणार नाही.

पहा व्हिडिओ -

श्री कालिचरण महाराज या स्तोत्राचे पठन करत असताना तिथल्याच एका भाविकाने या व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर उपलोड केला. सध्या हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे. कालीचरण महाराज हे एक धार्मिक गुरु असून, याधीही त्यांचे अनेक स्तोत्र, गीते, पूजा-मंत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. श्री कालीचरण महाराज यांना शिव तांडव, भागवत कथा, महिषासुर मर्दिनी आणि अशा अनेक शास्त्रांचे ज्ञान आहे. आता आपल्या खणखणीत आवाजामध्ये त्यांनी शिव तांडव स्तोत्र गायले आहे. (हेही वाचा:  कोरोना व्हायरसमुळे जेजुरी येथे 20 जुलै रोजी होणारी खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द)

दरम्यान, हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक, सावन महिना 6 जुलैपासून सुरू झाला. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, सावन मधील सोमवारला सोम किंवा चंद्रवार असेही म्हणतात. हा दिवस भगवान शिव यांना प्रिय आहे. या महिन्यात मंगळवारी मंगळगौरी व्रत, बुधवारी बुध गणपती व्रत, गुरुवारी गुरु व्रत, शुक्रवारी जीविका व्रत, शनिवारी बजरंग बली व नरसिंह व्रत आणि रविवारी सूर्य व्रत केले जाते. यासह या महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते.