Shantabai Pawar | Photo Credits: Twitter

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा काळ हा अनेकांना खूप काही शिकवणारा आहे. काहींमध्ये अस्वस्थता, नैराश्य वाढत आहे तर काही जण या कठीण काळातही सकारात्मक उर्जा दाखवत 'वेळ'च आहे ही लवकरच सरेल. अशी आशा बाळगून आहेत. दरम्यान पुणे (Pune) शहरात कोरोनाचा हाहाकार असला तरीही 85 वर्षीय शांताबाई पवार (Shantabai Pawar) या सुपर आजी सध्या अर्थाजनासाठी मार्शिल आर्ट्सची कसरत दाखवत सध्या बाहेर पडल्या आहेत. मागील 2 दिवसांपासून शांताबाई पवार यांच्या 'कसरती'चे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहेत. दरम्यान मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने शांताबाईंवरही हालाखीची परिस्थिती आली आहे. उधारीवर रेशनदेखील मिळत नसल्याने आता पोटापाण्यासाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या काही मुलांसाठी त्या बाहेर पडून मार्शल आर्ट्सचे खेळ करतात आणि पैसे कमवतात अशी प्रतिक्रिया त्यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.

शांताबाई पवार या लाठ्या-काठ्याच्या मदतीने ज्याप्रकारे आपली कसरत दाखवत आहेत त्याची भूरळ अनेकांना पडली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने देखील शांताबाई पवार यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांचं कौतुक केले आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांनी मदतीचे हात देखील पुढे केले आहे. सामान्यांमधून त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

रितेश देशमुखचं ट्वीट

शांंताबाईंसाठी मदतीचा ओघ 

मीडियाशी बोलताना शांताबाई पवार यांनी जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. त्यांनी सीता और गीता, 'त्रिदेव' सिनेमातही काम केले असल्याची माहिती दिली आहे. सध्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये असलेल्या शांताबाई पवार यांना सोशल मीडियामधून मिळालेल्या ओळखीतून आता अनेकांनी मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केले आहे. काहींनी त्यांच्या नातींच्या शिक्षणाचा भार देखील उचलला आहे.