Senior Citizen Salsa Danc: ज्येष्ठ नागरिकाचा तरुणीसोबत सालसा डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Senior Citizen Salsa Danc | (Photo Credits-Instagram)

डान्स करण्यासाठी तुम्ही म्हातारे झालात किंवा तुमचे वय झाले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओत एक ज्येष्ठ नागरिक तरुणीसोबत सालसा डान्स (Senior Citizen Salsa Danc) करताना दिसत आहे. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. हा व्हिडिओ (Senior Citizen Salsa Danc With Young Woman) पाहिल्यावर कदाचीत तुम्हालाही वय वाढल्यासारखे वाटणार नाही. तसेच, तुम्ही वयाने लहान असाल तर तुमच्यातही उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल ( Viral Video) झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ गुड न्यूज मूव्हमेंटने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. छोट्या क्लिपमध्ये एक वृद्ध पुरुष एका महिलेसोबत साल्सा करताना दिसतो. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक वृद्ध नागरिक एका पार्टीत आहे आणि त्याच्या मनाला आवडेल अशा गाण्यावर तो नाचत आहे. इतकेच नव्हे तर त्या ज्येष्ठ नागरिकासोबत एक तरुणही तिथे दिसत आहे. हा वृदध नागरिक तरुणीसोबत साल्सा डान्स करतो आहे. त्याच्या हालचाली अगदी चपळ आणि तरुणीला साजेशा होत्या. नृत्यामध्ये तरुणीच्या वेगासोबत या नागरिकाचाही वेग कायम आहे हे विशेष. या तरुण ज्येष्ठ नागरिकाचा उत्साह पाऊन उपस्थित जमावाने एकच जल्लोष केला. जमावाचे पोत्साहन पाहून वृद्धाने या तरुणीला आपल्या कवेत घेतले. (हेही वाचा, Viral Video: स्कूल बसची वाट पाहणाऱ्या कुत्र्यांना पाहून नेटकरी खूश, म्हणाले 'कित्ती गोड'; पाहा व्हायरल व्हिडिओ)

ट्विट

गुड न्यूज मूव्हमेंटने इस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, वय हा केळ एक आकडा आहे. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या व्हिडिओला तब्बल 2.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. वृद्ध माणसाच्या किलर डान्स मूव्ह्सवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. एका युजरने लिहिले आहे की, या नागरिकाचा डान्स पाहून मला अधिक तरुण झाल्यासारखे वाटले. दुसऱ्या एका युजर्सने लिहिले आहे की, खुपच सुंदर आणि मजेदार डान्स.