सारसबागेतील गणेशमूर्तीला पुण्याच्या थंडीचा कडाका, सोशल मीडियावर स्वेटर- टोपी घातलेल्या गणेशमुर्तीचा फोटो व्हायरल
sarasbaug Ganpati and Pune Winter (Photo Credits: Facebook/ Sudhir Bawa)

Sarasbaug Ganpati Pune Winter Look 2018-19  :  सध्या महाराष्ट्रभर थंडीचा पारा चांगलाच खाली उतरला आहे. वातावरणात थंडावा आल्याने अनेकांनी थंडीचे गरम कपडे बाहेर काढले आहे. पुण्यामध्ये तर दरवर्षीप्रमाणे सारसबागेतील म्हणजे तळ्यातला गणपती (Sarasbaug Ganpati Temple ) देखील थंडीने कुकडला आहे. आता नियमित सारसबागेतील गणेशमूर्तीला देखील स्वेटर आणि टोपी घालण्यात आली आहे. गणपतीचं हे लोभसवाणं रूप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणेकरांनीदेखील या गणपतीला पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

sarasbaug
sarasbaug Ganpati and Pune Winter (Photo Credits: Facebook/ Sudhir Bawa)

सध्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वातावरणाची नोंद पुण्यात आहे. पुण्यात किमान तापमान 8 डिग्री आहे. पुण्यासोबतच नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथील तापमान खाली गेले आहे. १२६ वर्षांपूर्वी असा सुरू झाला श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणेशोत्सव

सारसबाग गणपती

सारसबाग गणपती हा पुण्यातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण केंद्र आहे. पर्वतीच्या पायथ्याशी सारसबाग गणपती मंदीर आहे. तळ्यातला गणपती अशीदेखील या गणपतीची ओळख आहे. सवाई माधवराव पेशवे यांनी सारसबाग आणि या गणपती मंदिराची स्थापना केली. पर्वतीवर फिरायला येणारे अनेकजण या मंदिराचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती संगमरवरी आणि उजव्या सोंडेची आहे. माधवरावांना एका स्वारीवर जाताना झालेल्या दृष्टांतानंतर या गणपतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.